शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रीय महिला दिन


 ■राष्ट्रीय महिला दिन विशेष लेख■

★भारताच्या इतिहासातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस 13 फेब्रुवारी हा दिवस दर वर्षी राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो

★देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा म्हणजे 13 फेब्रुवारी हा  जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस संपूर्ण भारतात साजरा करतात 

★भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे.

व्यक्ती विशेष

◆ सरोजिनी नायडू ◆

★जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. 

★ त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. 

★ भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. 

उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल पद त्यांनी इ.स १९४७ ते  इ.स १९४९ या काळात भूषविलेले आहे.

★ सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.

अधिक माहिती साठी जॉईन करा आपले टेलिग्राम चँनल👇👇👇

T.me/TOPPER9 चालू घडामोडी

👨🏻‍💻माहिती संकलन :- Amar chavan

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा